अकलूज प्रतिनिधी
जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेतर्फे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचे स्नेहसंमेलन घेण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील कार्याध्यक्ष गुलाब शेठ जाधव हनुमंत भोसले उपाध्यक्ष सचिव सुनील दादा पवार चंद्रकांत कदम राजू कदम दीपक कदम निलेश वानारे किशोर जाधव माऊली जाधव गोरख मोहिते अविनाश पवार मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
घडशी समाज संघटना सामाजिक शैक्षणिक धार्मिक या विषयावर चर्चा करण्यात आली यापुढे वेळ पडल्यास सर्वांनी एकत्रित येऊन समाज हितासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे असे विचार कार्यकर्त्यांनी उपस्थित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषद सदस्य अमोलजी मिटकरी यांनी घडशी समाजाचे निवेदन
जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी समाजाच्या प्रलंबित मागण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून समाजाला न्याय मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अशोक दादा गायकवाड राहुल डेरे पाटील राष्ट्रवादी नेते युवा समाज संघटनेचे कार्यकर्ते राम कृष्ण हरी साळुंखे पाटील कार्याध्यक्ष गुलाब शेठ जाधव सुनील दादा पवार इत्यादी उपस्थित होते