सोलापूर प्रतिनिधी
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी मुंबई कडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र धोत्री येथील, श्री.भगवती गौरीमाता प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास व राज्यशास्त्र विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री.स्वामीनाथ कलशेट्टी सरांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.श्री.श्री 1008 ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, काशी महापीठ* यांच्या अमृत हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्रीमद काशी जगद्गुरुंनी आपल्या आशीर्वाचनातून प्रा. कलशेट्टी सरांच्या विविध कार्याचा गुणगौरव करून शुभाशीर्वाद दिले. कलशेट्टी सर हे आमच्या संस्थेतील इतिहास अभ्यासक, व्याख्याते, निरुपणकार, पर्यावरण प्रेमी,पालक विद्यार्थीप्रिय, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे असल्यामुळेच व सरांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना आजपर्यंत एकूण 92 हून अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे असेही म्हणाले.कलशेट्टी सरांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये नामवंत पदावर कार्यरत आहेत.
सरांच्या या गौरवामुळे श्री. बृहन्मठ होटगी मठाचे मठाधिपती श्री.ष.ब्र. चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी शुभाशीर्वाद दिले. संस्थेचे सचिव मा. श्री शांतय्या स्वामी सर,संचालक मा.श्री शशिकांत रामपुरे, साहेब,कलबुर्गी येथील माजी मुख्याध्यापक, ओंकारेश्वर सर, मुख्याध्यापक अमोगसिद्ध बिराजदार,शांतू स्वामी सर,भारत पाटील सर,संतोष हिरेमठ,परमेश्वर हिरेमठ,यमनप्पा होटगोंड,बसवराज स्वामी,हणमंत पाटील(गौडा), पुजारी सर,संतोष होटगे,आदिनीं मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन कौतुक करून अशीच यशस्वी वाटचाल यापुढील काळात होत राहो अशी सदिच्छा व्यक्त केले.