वर्धा प्रतिनिधी
22 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्यस्तरीय पोलीस पाटील यांचा मोर्चा निघणार त्या मोर्चामध्ये आपल्या वर्धा जिल्ह्याचा सहभाग असेल त्याचे नियोजन झालेले असून वर्धा जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघातर्फे मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे अंदाजे जिल्ह्यातील पाचशे ते सहाशे पोलीस पाटील मोर्चामध्ये सहभागी होतील.
पोलीस पाटलांच्या मूळ मागण्याकरिता हा मोर्चा आयोजित केलेला आहे गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे राज्यातील अंदाजे पंचवीस हजार पोलीस पाटील यात सहभागी होतील असा अंदाज आहे अशी माहिती वर्धा जिल्हा गाव कामगार संघाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री अमित लुंगे पाटील यांनी दिली.
अमित लुंगे हे पोलीस पाटील यांच्या हक्क आणि समस्या यांच्या साठी सतत संघर्षरत आणि प्रयत्नशील असतात.
Visionindia२४ शी बोलताना खालील प्रमुख मागण्यांचा उल्लेख केला. आणि त्या साठी आणि पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार अशी ग्वाही दिली.
त्यांनी दिलेल्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
पोलीस पाटील यांचे मानधन १८००० रुपये करावे. आणि त्या व्यतिरिक्त ३००० रुपये इतर भत्ता म्हणून द्यावे. निवृत्ती चे वय अंगणवाडी सेविका प्रमाणे ६५ वर्ष करावे.०५ लाख रुपये विमा आणि मेडिक्लेम शासनातर्फे देण्यात यावे,नूतनीकरण ५ वर्ष झाल्यानंतर कायमस्वरूपी बंद करण्यात यावे,नव्याने झालेल्या पोलीस स्टेशन ला असणाऱ्या पोलीस पाटील यांची पदे निवृत्ती काळ पर्यन्त खंडीत करू नये.