पंढरपूर प्रतिनिधी
जळोली गावातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामकाजाच्या तक्रारी संदर्भात सुपरवायझर साठे मॅडम एकात्मिक बाल विकास विभाग पंढरपूर यांना धनगरवस्ती जळोली येथील अंगणवाडी येथे निवेदन देण्यात आले.
जळोली गावात एकूण 5 अंगणवाडी आहेत तरी या सर्व अंगणवाडी वेळेवर भरत नसून वेळेवर सुटत नाही आणि खाऊ शाळेतून घरी जाताना एकदाच व निकृष्ट दर्जाचा दिला जातो तरी सदर प्रकरणाकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा जनशक्ती संघटना पालका समवेत पंचायत समिती पंढरपूर येथे आंदोलन करण्यात येईल आसा इशारा जनशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तसेच सर्व पालकांनी अंगणवाडी वेळेवर भरत नसून वेळेवर सुटत नाही आणि खाऊ निकृष्ट दर्जाचा दिला जातो या संदर्भात वेळोवेळी तोंडी तक्रारी अंगणवाडी सेविका यांना दिल्या तरी पण जळोली गावात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना काही फरक पडत नाही. म्हणून पालकांनी सुपरवायझर साठे मॅडम यांना या ठिकाणी बोलवुन आपल्या सर्व तक्रारीचा पाडा वाचुन दाखवला.
निवेदन देताना बिभीषण शिरसट ( युवा जिल्हा संघटक सोलापूर जनशक्ती संघटना ), जळोलीचे सरपंच ज्योतीराम तात्या मदने, उपसरपंच मनोज भाऊ नरसाळे, जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आणि सर्व पाल्यांचे पालक तसेच गावातील नागरिक उपस्थितीत निवेदन देण्यात आले.