पिंपळनेर प्रतिनिधी
टेंभुर्णी-शहर ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सिध्देश्वर शिंदे, उपाध्यक्षपदी हरीश्चंद्र गाडेकर, सचिवपदी गणेश पोळ,सहसचिव पदी विनायक जोशी तर खजिनदार पदी महेश देशमुख यांची निवड संघटनेचे सल्लागार ,ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी, संस्थापक-अध्यक्ष संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. २० डिसेंबर रोजी टेंभुर्णी येथे संघटनेची बैठक माजी अध्यक्ष गणेश पोळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सदर निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुहास कांबळे, सज्जन शिंदे,प्रदिप पाटील,धनंजय भोसले, सतिश थोरात, राजेंद्र दडस, विकास श्रीखंडे,सोमनाथ निर्धार आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी,सुहास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.