सोलापूर प्रतिनिधी
विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेने ज्युदो व तायक्वांदोच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सुयश प्राप्त केले. या स्पर्धेत शाळेतील १४ खेळाडूंनी सहभाग घेतले.आठ खेळाडूंनी सुवर्ण पदक तर सहा खेळाडूंनी रौप्य पदक मिळविले.विभागीय स्पर्धेत सतिश बंडाने सुवर्ण पदक मिळविला तर ज्योती लवटे व दर्शनी चव्हाण यांने रौप्य पदक पटकाविले.
ज्योती लवटे, कार्तिका सिंह, रागिणी मगजी, दर्शनी चव्हाण, श्रीचरण निली, सतिश बंडा,रामचरण बोडा, नंदिनी मगजी, सिद्धाराम साळे, गौतम साखरे, समर्थ बेंद्रे या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.सहशिक्षक एम. एस. बिराजदार व प्रशिक्षक विश्वजीत मरबे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.