पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आयान अख्तर शेख याने वयोगट १९ अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरी अथलेटिक्स स्पर्धेमध्ये गोळा फेक आणि थाळीफेक या खेळ प्रकारामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेसाठी एकूण ७० खेळाडू सहभागी झाले होते.तर ३५ ज्युनिअर कॉलेजने प्रत्यक्ष सहभाग नोंदविला होता. अशी माहिती लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले यांनी दिली.आयानच्या या विजयाबद्दल संस्थेचे खजिनदार दादासाहेब रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आयानला स्पर्धेमध्ये विजय मिळवण्यासाठी ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडा शिक्षिका अस्मिता घोलप आणि ज्युनिअर कॉलेजचे विभागप्रमुख ज्ञानेश्वर वायदंडे यांनी परिश्रम घेतले.
आयानची जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे,तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग,यांनी अभिनंदन केले.