पंढरपूर प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत तालुका पंढरपूर यांच्यातर्फे २४ डिसेंबर ग्राहक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ग्राहक पंधरवडा याचे आज उद्घाटन करण्यात आले.
दिनांक १५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीमध्ये शासकीय,निमशासकीय, खाजगी कार्यालय तसेच बँक, शाळा, पोस्ट ऑफिस, रेल्वे, एसटी स्टँड, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ग्राहक प्रबोधन व जागृती मिळावे अभियान घेण्यात येणार आहे.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री विश्वंभर पाटील जिल्हा अध्यक्ष कर सल्लागार संघटना, मा. श्री विनोद भरते सर प्रांत सह कोषाध्यक्ष, मा. श्री शशिकांत हरीदास सर जिल्हाध्यक्ष मा. श्री दीपक इरकल सर,जिल्हा संघटक, श्री अण्णा ऐतवाडकर सर,श्री अल्लापुरकर गुरुजी ,जिल्हा कोषाध्यक्ष श्री सुहास निकते तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये ,तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे ,संघटक श्री महेश भोसले सर,सहसंघटक आझाद अल्लापुरकर, सचिव श्री धनंजय पंदे सर ,सहसचिव पाठक सर ,CA तेजस फडे,जिल्हा तक्रार सल्लागार मध्यस्थ मंडळ सदस्य श्री लंगोटे त्याचबरोबर सर्व मान्यवर सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ग्राहक पंधरवडयाचे उद्घाटन आज करण्यात आले.
कर सल्लागार श्री विशंभर पाटील साहेब यांनी GST टॅक्स बद्दल खूप माहिती सांगितली. दीपक इटकर सर यांनी संघटनेचे कार्य व सुधारित ग्राहक संरक्षण कायदा २०१९ बाबत माहिती सांगितली.श्री विनोद भरती सर यांनी संघटनेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश भोसले सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री धनंजय पंदे सर यांनी केले.
या कालावधीत शहरातील विविध शासकीय कार्यालयामध्ये राहत दिन साजरा करण्यात येऊन लोकांच्या हितासाठी असलेला हा ग्राहक संरक्षण कायदा पोहोचावा आज या त्या मागचा हेतू आहे यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा व तालुका कार्यकारणी यासाठी प्रयत्नशील असून राहत पंधराव्या ची सुरुवात 15 डिसेंबर पासून करण्यात आली आहे.अशी माहिती नंदकुमार देशपांडे यांनी दिली.