गादेगाव प्रतिनिधी
शालेय आट्यापाट्या स्पर्धेमध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या व मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला बार्शी येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये जवळपास 40 हून अधिक संघाने सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धा ही अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली.
या स्पर्धेमध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील 17 वर्षे व 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर दुसरा क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आटपट्या असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कापसे व उपसरपंच संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी अभिनंदन केले.
सदर टीमला दत्ता झांबरे ,मल्हारी भुसनर, सचिन कदम यांनी कोच म्हणून काम पाहिले. शिवरत्न च्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रशालेचे सहशिक्षक राजेंद्र मोलाने ,नागेश कांबळे ,दीपक देशमुख ,नियाज मुलानी, सोमनाथ भोईटे, शितल मस्के ,शितल बागल, अजय मोरे, लीना बागल, प्राजक्ता मस्के ,व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या