मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
समाजसेवक, पत्रकार, कवी श्री. शशिकांत रा सावंत यांना आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन च्या वतीने नवी दिल्ली येथे न्यू महाराष्ट्र सदन प्रेस कॉन्फरन्स हॉलमध्ये २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान दिन श्रीमती जानीश दरबारी (आय.ए.एस.) वाणिज्य दूत मॉन्टेरिया यांच्या हस्ते "भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकर नॅशनल पुरस्कार " समाजसेवा, पत्रकारिता, साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी त्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र तसेच मेडल देऊन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते, माजी लोकसभा अध्यक्ष चरणसिंग अटवाल, विनायकराव जाधव, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, डॉ. मनीष गवई आयोजक आदी मान्यवर उपस्थित होते. शशिकांत सावंत यांना आतापर्यंत ९० राष्ट्रीय व राज्यस्थरीय पुरस्कार समाजसेवा पत्रकारिता, साहित्य, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्राप्त झाले आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या डायमंड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्थरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा, शुभेछ्याचा वर्षाव होत आहे.