सोलापूर प्रतिनिधी
केंगाव येथील सिंहगड महाविद्यालयात सीआरपीएफ ची विंग असलेल्या रॅपिड ऍक्शन फोर्स च्या वतीने शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट स्वप्नील पवार, इन्स्पेक्टर आर. के. पांडा, भाव्या भास्करण, तसेच सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रविंद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, इस्टेट ऑफिसर डॉ. दत्तात्रय नवले, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सुनीता जॉन्सन,उपप्राचार्य प्रकाश नवले उपस्थित होते.तसेच असिस्टंट कमांडंट स्वप्नील पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना रॅपिड ऍक्शन फोर्स बद्दल माहिती दिली.
रॅपिड ऍक्शन फोर्स चा उद्देश, समाजात शांतता राखण्यासाठी , दंगलीदरम्यान बेकाबू जमाव नियंत्रित करणे, प्रक्षुब्ध जमावाला पांगवणे यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी शीघ्र कृती दल संपूर्ण भारतात कार्यरत असते. तसेच नैसर्गिक आपत्ती, आणीबाणीच्या प्रसंगी देखील आपली सेवा बजावत असते विद्यार्थ्यांनी संरक्षण क्षेत्रात करिअर करावे याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी रॅपिड ऍक्शन फोर्स वापरत असलेली विविध शस्त्रे जसे कीएके ४७, पिस्तूल, अश्रूधुर नळकांड्या कसे वापरतात तसेच इतर सामुग्रीचे प्रदर्शन व सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी सिंहगड सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी विद्यार्थांना अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सीआरपीएफ मध्ये सुद्धा संधी उपलब्ध आहेत.
याविषयी मार्गदर्शन केले तसेच सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सुनीता जॉन्सन यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी सिंहगड कॉलेज व सिंहगड पब्लिक स्कूल चे विद्यार्थी उपस्थित होते.