कोश्यारी चले जाव म्हणत, सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपाने माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
सोलापुर प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी दोघांचीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची केलेली वक्तव्ये निंदनीय आणि संतापजनक आहेत. या दोघांचा निषेध करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली पांजरापोळ चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवी साखळी करुन निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजीने परीषर दणाणुन गेला.
यावेळी बोलताना प्रकाश वाले म्हणाले की, निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसून बसून सतत अपमान करतात भाजपच्याच बगलबच्चे असलेले भाज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज बद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. सत्तेची गुर्मी चढलेल्या राज्यपाल कोश्यारी व भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना भाजपाच्या नेत्यांशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. या अगोदर ही सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल ही अपशब्द वापरले होते. उठसुठ सतत बाष्फळ बड़बड़ करणारे भाजपचा नेते निषेध करत नाही सगळे बिळात लपून बसले आहेत. छत्रपतींचा अपमान भाजपला मान्य आहे का? या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेला असून महाराष्ट्रातील जनता छत्रपतीं शिवाजी महाराज यांचा अपमान खपवून घेणार नाही. अश्या वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनेही अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रकाश वाले यांनी दिला.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, मा. नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, उदय चाकोते, देवाभाऊ गायकवाड़, लक्ष्मीकांत साका, उत्तर समन्वयक सुनील रसाळे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, युवक प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, मध्य अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, पशुपती माशाळ, प्रवीण वाले, संजय गायकवाड़, अनिल मस्के, सायमन गट्टू, कोंडनताई काकड़े, बसवराज म्हेत्रे, प्रमिला तुपलवंडे, अंजली मंगोडेकर, विवेक कन्ना, राजेन्द्र शिरकुल, सुनील सारंगी, जीवक इंगळे, नूर अहमद नालवार, रमेश कोळी, VD गायकवाड़,, राहुल बोळकोटे, चक्रपाणी गज्जम, सुमन जाधव, विवेक इंगळे, शाहू सलगर, सुनील व्हटकर, चंद्रकांत टिक्के, वसिष्ठ सोनकंबळे, शोभा बोबे, बसंती सालुंखे, नागनाथ शावने, श्रीकांत दासरी, शिवाजी सालुंखे, संध्या काळे, नीता बनसोडे, तस्लीमा शेख, मुमताज तांबोली, सुनीता बेरा, चंदा काळे, नुसरत शेख, नाहिद शेख, बसु कोळी, स्नेहल शिंदे, अनवरबी शेख, शिव कोरे, लता सोनकाम्बले, अनिता भालेराव, अंजुमन शेख, पिंटू माने, यांच्यासह शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.