आळंदी प्रतिनिधी
प्रतिवर्षी प्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा करता संत नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूर येथून आळंदी येथे आली आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा उद्या मंगळवार दिनांक २२ रोजी संत नामदेव महाराज यांचे वंशजांचे मानाचे समाधी वर्णनाचे किर्तन मुख्य विणा मंडपात होवून साजरा होणार आहे संत नामदेव महाराज यांचे पंढरपूर येथुन आलेल्या पादुका यावेळी माऊलींच्या समाधी समिप ठेवल्या जातील.
संत नामदेव महाराज यांची पंढरपूर येथुन आलेली पालखी विसावा विष्णू मंदीर येथे आहे आज संत नामदेव महाराज यांचे पादुका दर्शन व वंशजांची भेट विष्णू मंदीर येथे नामदेव शिंपी समाज युवक संघाचे सदस्यांनी घेतली.