महुद प्रतिनिधी
महुद येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तपपुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे.
या सोहळ्यानिमित्त वर्षभरात काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार या सप्ताहामध्ये ह.भ.प. गुरुवर्य नारायण महाराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. व सहभागी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा महुद बु|| जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी, मॉडर्न गर्ल हायस्कूल, श्री शिवाजी विद्यालय महुद बु|| फिनिक्स इंग्लिश स्कूल महुद बु|| इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
नंबर आलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन गुरुवर्य नारायण महाराज शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सप्ताहाचे व्यासपीठ चालक गुरुवर्य सुदाम महाराज मतकर, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सोलापूर सहजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली हेटकळे, व्यसनमुक्त युवक संघाचे तालुकाध्यक्ष भीमराव येडगे सर, व्यसनमुक्त युवक संघाचे शाखाअध्यक्ष मोहन जाधव सर, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे शिक्षक दर्याबा येडगे सर, भारत नाना यलमर, प्रमोद कोळेकर, बाबासो चौगुले व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.