चाकण प्रतिनिधी
वारकरी संप्रदाय व भागवत धर्माचे आद्य प्रचारक श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान पंजाब अशा सायकलवारीचे व रथयात्रेचे आयोजन करण्यात आले संत नामदेव महाराज जयंती दिनी पंढरपूर मधून निघालेली या सायकलवारी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी झेंडा दाखवून सायकल वारीस सुरुवात करुन शुभेच्छा दिल्या पुढे ही रथयात्रा मार्गस्थ असताना विविध ठिकाणी स्वागत होत आहे कल वारीद्वारे शांती समता बंधुता माझा प्रचार आणि प्रसार व राष्ट्रीय एकात्मता असा संदेश देण्यात येत आहे.
आज सकाळी ही रथयात्रा व सायकल वारी चाकण शहरांमध्ये दाखल झाल्यानंतर नामदेव शिंपी सजमाज संस्था चाकण नामदेव, शिंपी समाज धर्मशाळा आळंदी, नामदेव शिंपी समाज युवक संघ पुणे जिल्हा, नामदेव शिंपी समाज युवक संघ उद्योग मार्गदर्शक मंडळ, नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नामदेव शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब निखळ नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष सिद्धेश हिरवे महेश जी हाबडे किशोरजी बोरसे भाजपा युवा मोर्चाचे शिरूर मा अध्यक्ष अनिल जी नवले ऋषिकेश भस्मे...आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते