फिटनेस बडी हेल्थ क्लब, श्रीराम आय क्लिनिक यांचे लाभले सहकार्य
नाशिक प्रतिनिधी
नाशिक येथील नमस्ते नाशिक फौंडेशनच्या वतीने फिटनेस बडी हेल्थ क्लब आणि डॉ. अर्पित शहा संचालित श्रीराम आय क्लिनिक यांच्या विशेष सहकार्याने शनिवारी ( दि. २६) आयोजित करण्यात आलेल्या मोफत शरीर आणि नेत्र तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. सुमारे १०० जणांनी शिबिराचा लाभ घेतला.
गोविंद नगरस्थित चौक क्रमांक ४ नजीक असलेल्या निर्मला देवी ध्यान मंदिरात सकाळच्या सत्रामध्ये विनामूल्य स्वरूपाचे हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात सर्व वयोगटातील नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. फिटनेस बडी हेल्थ क्लबच्या वतीने अत्याधुनिक यंत्राद्वारे तपासणी करण्यात येऊन शिबिरार्थींना शास्त्रोक्त टीप्स देण्यात आल्या. श्रीराम आय क्लिनिकतर्फे नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. याप्रसंगी फिटनेस बडी हेल्थ क्लबचे पदाधिकारी स्मिता गभाले, अमोल देसाई, पुष्कर पाठक, संजय जाधव यांसह श्रीराम आय क्लिनिकचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी नगरसेवक प्रवीण तिदमे, होरायझन अकॅडेमीच्या प्राचार्य डॉ. सुरेखा कुलकर्णी यांसह मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
शिबिर यशस्वीतेसाठी फौंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव, उपाध्यक्ष मिलिंद सजगुरे, सचिव भावना कुलकर्णी, कोषाध्यक्ष संदीप देव आदींनी प्रयत्न केले.