सोलापूर प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील व्हीपी, शुगर कारखान्यास ऊस देणाऱ्या टाकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीटन तीन हजार रूपये हामीभाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी केली. परंतु कारखान्याचे पदाधिकारी हे तीन हजार रुपये हामीभाव देण्यास तयार नाही. म्हणून आनंद बुक्कानुरे यांनी संपर्कप्रमुख श्री. अनिल कोकीळ साहेब व जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २१ नोव्हेंबर २०२२ सोमवार पासून कारखान्यासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागात असलेल्या व्हीपी, शुगर कारखान्यास ऊस टाकणाऱ्या शेतकऱ्यांना तीन हजार रूपये प्रतिटन हामीभाव देण्यात यावी अशी मागणी अक्कलकोट तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आली. परंतु सुमारे १५ दिवसापासून या मागणीसाठी अक्कलकोट तालुका शिवसेना पदाधिकारी व ऊस टकाणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर अनेकवेळा चर्चा करूनही कारखान्याचे पदाधिकारी मागणीबाबत कुठलाही सकारात्मक भुमिका घेण्यास तयार नाहीत. म्हणून शिवसेनेच्या वतीने अनेकवेळा रास्ता रोखो व कारखान्यासमोर निदर्शने करून आमरण उपोषणाचा ईशारा दिला होता. तरीही कारखाना मालक दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी शेतकऱ्यांच्या हिताच्या व मागणीच्या विचार करून सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री. अनिल कोकीळ साहेब व जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अक्कलकोट तालुका उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख भिमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष केंगनाळकर यांच्या सहकार्याने व अक्कलकोट तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी सोमवार दि. २१ नोव्हेंबर पासून कारखान्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहेत.
या आंदोलनात तालुका संघटक सोफा निकते, भिमाशंकर म्हेत्रे, संतोष केंगनाळकर, संतोष पाटील, राजू बिराजदार, विश्वनाथ कोगुनुरे, संतोष रत्नाकर, संतोष घोडके व शिवसैनिक या आंदोलनात सामिल झाले आहेत.