पुणे प्रतिनिधी - सुभाष मुळे
जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, वृत्तपत्रलेखक व तेज न्यूज चॅनलचे पत्रकार गणेश हिरवे यांना साप्ताहिक भगवे वादळ यांच्या वतीने अंकाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या सोहळ्यात क्रांतीज्योती महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार कामगार नेते अभिजीत राणे, मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, माजी आमदार बाबुराव माने यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
विविध क्षेत्रातील अनेकजणांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन आम्ही पुरस्कार दिल्याचे भगवे वादळ चे संपादक दत्ता खंदारे यांनी दिली. हिरवे सर अनेक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, संस्कृतिक, आरोग्य, अध्यत्मिक क्षेत्रात काम करीत असून लॉकडाऊन मध्ये सुध्दा त्यांनी अनेक गरजू, वंचित घटकांना हर एक प्रकारे सहकार्य केलेलं आहे.
कोणी ना कोणी आपल्या चांगल्या कार्याची दखल घेऊन सन्मानित करत असते. यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढते व पुरस्कार मिाल्याने आपल्याला अधिक जोमाने काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते असे हिरवे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सांगितले असून भगवे वादळ चे संपादक दत्ता खंदारे यांचे आभार मानले आहेत.
हिरवे सरांना आतापर्यंत १२० पुरस्कार व करोनाच्या दोन वर्ष कालावधीत केलेल्या चांगल्या कामासाठी ७७ करोना योद्धा सन्मानपत्र मिळालेली आहेत.आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने समाजातील अनेक स्तरातून हिरवे सरांचे अभिनंदन होत आहे.
हा पुरस्कार मिळाल्या बद्दल संपादक प्रशांत माळवदे यांनी गणेश हिरवे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.