सोलापूर प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दिनांक 7 नोव्हेंबर 2000 रोजी प्रथम शाळेत दाखल झाले होते.
त्याप्रित्यर्थ सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जि प प्रा शाळा,शेळवे येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजीराजे वाघुले यांच्या अध्यक्षतेखाली आज विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. यावेळीं, मुख्याध्यापक शांताराम गाजरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून प्रत्येक माणूस हा जीवनभर विद्यार्थी असतो,असे सांगितले.नवनवीन शिकणे,नवनिर्मिती करणे हे ज्ञान वृद्धिंगत करण्याचे महत्त्वाचे टप्पे असल्याचे नमूद केले.
यावेळी पालक प्रशांत गाजरे,उपशिक्षिका शुभांगी माळी, उपशिक्षक सुनिल नाईकनवरे आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.शुभांगी माळी मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.