वर्धा प्रतिनिधी आकाश सुखदेवे
महाराष्ट्र चे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नियुक्त झाल्या पासून महाराष्ट्र राज्य, महापुरुष आणि महाराष्ट्र ची अस्मिता या बाबत सतत वादग्रस्त व अवमानकारक विधान करीत आहे. आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास ची मोडतोड करून विटंबना केली आहे. तसेंच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बाबत पातळीहीन वक्तव्य करून या महान दाम्पत्या च्या कार्याची अवहेलना केली आहे.
त्या करीता कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटाविण्याची मागणी स्वराज्य संगठन चे संस्थापक, आणि शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आणि शाहू महाराज यांचे वंशज युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी केली आहे. आणि तसे न झाल्यास जन आंदोलन संपूर्ण राज्यात करण्याचा इशारा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण प्रशासन ला त्यांनी दिला आहे.
या वर आज दिनांक 28 नोव्हेंबर ला सर्वपक्षीय आणि सर्व सामाजिक संगठन यांनी मिळून आज निवासी उपजिल्हाधिकारी मनोज कुमार खैरनार यांना निवेदन दिले. आणि राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध करून संताप व्यक्त करण्यात आला. यात प्रामुख्याने गजेंद्र सुरकार अंधश्रद्धा निर्मूलन समिती , विक्की सवाई विर सम्राट अशोक संगठन, आशिष ठाकरे छत्रपती संभाजी महाराज उद्यान चे प्रणेते, प्रशांत अवचट संघर्ष ऍग्रो, अंजुताई जिंदे वर्धा शहर आप महिला आघाडी प्रमुख, गीताताई ताकसांडे , पारस बाबुळकर शिवभक्त परिवार, नंदू मून स्वराज्य संगठन, आकाश सुखदेवे छत्रपती शाहू महाराज, फॉउंडेशन, रामभाऊ लष्कर मी वडार संगठन जिल्हाध्यक्ष,अजय नगराळे बांधकाम कामगार आघाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या मोहिमेला राजूभाऊ वाघमारे प्रदेश सचिव सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,नावेद रहीम शेख जिल्हाध्यक्ष वर्धा अल्पसंख्यांक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , नीरज गुजर माजी नगराध्यक्ष वर्धा नगरपरिषद, गौरव वानखेडे, प्रतीक पवार शिवभक्त परिवार,आशिष भाऊ सोनटक्के जिल्हाध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक संगठन,adv हर्षवर्धन गोडगाठे, रंजित इवनाथे शिवसेना ठाकरे गट, संदीप सावरकर जिल्हाध्यक्ष जय संघर्ष संगठन, किशोर खैरकार वंचित बहुजन आघाडी, प्रमोद भोमले आम आदमी पार्टी वर्धा जिल्हाध्यक्ष यांनी यास समर्थन दिले.