मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य (N.G O ) मंडळाचे संस्थापक,वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब राजाराम मोरे,राज्यध्यक्ष मा.श्री.प्रमोददादा सुभाष मोरे,महिला पर्यावरण सखी मंच अध्यक्ष श्रीमती प्रियवंदाताई तांबोटकर यांच्या मार्गदर्शनखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य (N.G.O) च्या जिल्हा कार्यकारणी मुंबईमध्ये पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने पर्यावरण संरक्षण, संवर्धन, शिक्षण, संशोधन, वृक्षारोपण आणि यासंबंधीची जनजागृती या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ म. रा. मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. कमलाकर मोरे व महिला पर्यावरण सखी मंच मुंबई अध्यक्ष सौ. विजया निलेश वाघमारे यांनी सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली-रेवाळेवाडीचे सुपुत्र विक्रोळी पश्चिम पार्क साईट येथील रहिवासी वृत्तपत्रलेखक /पत्रकार--शांत्ताराम लक्ष्मण गुडेकर ( Ex.S.E.O) यांची मुंबई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती केली आहे.
गुडेकर यांचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कामकाजामधील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्यला वृत्तपत्रलेखन/वृत्तसंकलन करुन सातत्याने सहकार्य केलेले काम तसेच राज्यातील पर्यावरण संतुलन आणि संवर्धन बाबत केलेले लिखाण शिवाय वाढत्या जंगल तोड विरुद्ध उठवलेला आवाज, जंगल तोड रोखण्यासाठी केलेले विविध वर्तमानपत्रात लेखन करुन दिलेले योगदान लक्षात घेऊन "मुंबई जिल्हा प्रसिद्धीप्रमुख "पदी २०२२-२५ या कालावधीसाठी नियुक्ती केली.नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. कमलाकर मोरे व सौ. विजया निलेश वाघमारे यांनी शांत्ताराम गुडेकर यांना प्रदान केले आहे.गुडेकर यांना महाराष्ट्र शासनाने "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून २०१२ ते २०१७ या काळावधीसाठी नियुक्त केले होते.
त्यांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर फँलोशिप पुरस्कार -दिल्ली प्राप्त झालेला आहे.ते महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दल-एन विभाग-क्षेत्र-३ मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.शिवाय महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ- महाराष्ट्र राज्य या मंडळतर्फे नशाबंदी चे काम करतात.कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई जिल्हा सचिव म्हणून ते काम पाहिले असून त्यांना नगर मित्र,आदर्श समाजसेवक ,समाजरत्न , दक्ष नागरिक ,कोकण भूषण ,वृत्तदिप पुरस्कार ,महापौर गौरवपत्र तसेच सोनी टि.व्ही वरील सी.आय.डी मालीकेला वर्धापनदिनानिमि आयोजित कार्यक्रमात शांत्ताराम गुडेकर यांना "स्थानिक हिरो" सी.आय.डी मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.
शांताराम गुडेकर महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग, महाराष्ट्र शासन चे सदस्य, माझी वसुंधरा, महाराष्ट्र शासन चे सदस्य आहेत. शिवाय माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना चे मुंबई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत.अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती चे मुंबई उपनगर सचिव आहेत.
शांत्ताराम गुडेकर यांची मुंबई जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल अनेक संस्था ,प्रतिष्ठान,संघ व शैक्षणिक ,राजकीय ,सामाजिक ,वृत्तपत्रलेखक संघटना,पत्रकार मंडळीच्या वतीने अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.