सलग १० दिवस चालणार्या जत्रेत विविध कार्यक्रमाची रेलचेल
दशावतारी नाटक, महिलांच्या भजनाची डबलबारी, महाराष्ट्राची लोकयात्रा आदी कार्यक्रमांचा समावेश
- शाखानिहाय कोविड योद्धांचा करण्यात येणार सन्मान
दरदिवशी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जत्रेचे आयोजन
- लहानमुलांसाठी आकर्षक पाळणे तसेच कोकणी व मालवणी खाद्यपदार्थांची चव चाखता येणार
मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या ३० वर्श्यापासून अविरतपणे आयोजित करण्यात येणारी कोकणी-मालवणी जत्रा ही आकर्षणाचे केंद्र असते. या जत्रेची जोगेश्वरीकर तसेच अन्य तालुक्यातील रहिवाशी चातकाप्रमाणे वाट बघत असतात. आकर्षणाचे केंद्र असणार्या या जत्रेचे उद्घाटन जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
४ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर असे १० दिवस ही जत्रा सुरू राहणार असून या जत्रेत विविध कार्यक्रमाची रेलचेलही असणार आहे. यंदा जत्रेत सुमारे ७५ स्टॉल्स उभारण्यात आले असून यात अस्सल कोकणी मालवणी सुका मेव्यापासून, हाताने बनविलेले दागिने, कपडे, कोकणी व मालवणी तसेच अन्य खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांचा समावेश आहे. बच्चे मंडळींसाठी विविध प्रकारचे पाळणे, खेळणी, रेलगाडी, चक्करडे, आदीं खेळणी असणार आहेत. जत्रेला येणार्या हजारो जत्रेकरुंसाठी खासकरुन कोकणातून आलेली दशावतारी नाटकांचे खेळ दरदिवशी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडणार आहेत. एवढेच नव्हे तर बुवा सुजाता पाटणकर (डोंबिवली) व बुवा दर्शना म्हसकर (वांगणी) यांच्या भजनाची डबलबारी, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकयात्रा या लोककलेच्या रंगतदार कार्यक्रमाचाही समावेश आहे.
शुक्रवारी या जत्रेचे उद्घाटन पार पडले असून यावेळी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, माजी नगरसेवक बाळा नर, रेखा रामवांशी ,विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, उपविभाग प्रमुख कैलाशनाथ पाठक, बाळा साटम, जयवंत लाड, जितेंद्र वळवी, , शाखा प्रमुख नंदु ताम्हणकर, प्रदीप गांधी, सुभाष मांजरेकर, नितीश म्हात्रे, अनिरुद्ध नारकर, मधुकर जुवाटकर, संदिप कोठारकर, प्रियंका आंबोळकर, दिपाशा पवार, लोना रावत, स्मिता साळसिंगीकर, रश्मी गोडांबे, अपर्णा परळकर, हर्षदा गावडे, समिक्षा माळी, सुचित्रा चव्हाण, शैलजा नरवणकर, मयुरी रेवाळे, वैशाली भिंगाडैॅ, संजिवनी दणदणे, साक्षी पाडावे, हर्षदा गावडे आदी पदाधिकारी, शिवसैनिक व जनता मोठ्याप्रमाणात उपस्थित होती.