पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ऐकरी भाषेत उल्लेख करून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि जेष्ठ नेते शरदचंद्र पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करून ते तुलना करूनही थांबले नाहीत.तर छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्यांच म्हणत शिवाजी महाराज पुराने जनाने के आदर्श है,अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है,असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केले आहे.
आज राज्यपालांनी दोन नेत्यांचा मोठेपणा सांगण्याचा नादात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना थेट गडकरींनी केली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला.याच कार्यक्रमात शरदचंद्र पवार, आणि नितिन गडकरी यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. पंढरपूर येथील शिवस्वराज्य युवा संघटनेचे व सकल मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते संदिपराजेमुटकुळे-पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.राज्यपालांनी यांनी यामागेपण वादग्रस्त विधानाने केली आहेत.असे वादग्रस्त विधान करायला नको होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व विरोधीपक्षनेते अजित दादा पवार यांनी शिवदोही राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी.अशी आक्रमक भूमिका शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी मांडली आहे.