पंढरपूर प्रतिनिधी
लायन्स क्वेस्ट सामाजिक आणि भावनिक शिक्षण २१ व्या शतकाकडे वाटचाल ज्यातू नबालवय आणि कौशल्य(SFG) उमलतं वय आणि कौशल्य(SFA)शाळा बाह्य कार्यक्रम(SFA for OST) यावर आधारित असणारा Lions Quest हा कार्यक्रम लायन्स क्लब पंढरपूरतर्फे लक्ष्मणदास महाराज आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेज वाखरी या ठिकाणी दिनांक १८ व १९ नोव्हेंबर या दोन दिवशी समर्थपणे संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण पश्चिम भागातील सुमारे २० शाळातील ३४ शिक्षक या प्रशिक्षणासाठी निवडले होते.सर्वच शाळा मुख्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या प्रशिक्षणास शिक्षक पाठवले होते.
प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षक ला.Mjf डॉ.ज्योती तोष्णीवाल या लाभल्या होत्या.तसेच डिस्ट्रिक्ट क्वेस्ट चेअरमन ला.सुहासजी निकम यांचे अत्यंत कुशल असे मार्गदर्शन लाभले.
ला.ज्योती तोष्णीवाल यांनी सलग दोन दिवस विविध उपक्रमांद्वारे क्वेस्टचे उद्देश शिक्षकांमध्ये उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.सलग आठ ,आठ तास प्रशिक्षणार्थी शिक्षक पुरेपूर मग्न होऊन शिकत होते.प्रतिसाद देत होते.प्रशिक्षण हे कृतीयुक्त आनंददायी होते.त्यामुळे सर्वानी प्रशिक्षणाबाबत १००% समाधान व्यक्त केले.मनोगता मधे. शिक्षक प्रतिनिधी श्री.विक्रम बिस्किटे,श्री.अमोल कुलकर्णी,श्री.भरतारी विधाते,श्री.लिंगडे यांनी या प्रशिक्षणात मिळालेले ज्ञान हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्याचे फलित २ वर्षांत देण्याचा मानस व्यक्त केला.व आजपर्यंत झालेल्या प्रशिक्षणातील आगळेवेगळे व १००%उपयुक्त प्रशिक्षण असे विचार व्यक्त केले.
प्रशिक्षणार्थ्याना लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे हे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.तसेच निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना Lions Quest अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी वाखरी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.सुभाष सोनवणे तसेच प्राचार्य मा.श्री.संजय मोरे यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले.
प्रशिक्षणाच्या प्रथम दिवशी लायन्स 3234 प्रांताचे प्रांतपाल ला.mjf राजशेखरजी कापसे व त्यांच्या सुविद्य पत्नी ला. कापसे व झोन चेअरमन ला.राजीवजी कटेकर यांची उपस्थिती लाभली होती.
द्वितीय दिवशी लायन्स प्रांत 3234 D1 चे द्वितीय प्रांतपाल ला.ऍड.mjf मल्लिनाथ पाटील,संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाष सोनवणे यांची व पी आर ओ ला.डॉ.अभिजित जोशी,ला.माणिकजी गोयल,ला.गंगाप्रसाद बंडेवार,ला.डॉ.सुजाता गुंडेवार यांची उपस्थिती लाभली होती.
लायन्स क्लब पंढरपूरचे अध्यक्ष.ला विवेक परदेशी,क्लबच्या सेक्रेटरी व लायन्स क्वेस्टच्या चेअरमन ला.ललिता कोळवले,ट्रेझरर ला.डॉ.मंदार सोनवणे,को ट्रेझरर ला.डॉ.ऋचा सोनवणे,ला.कैलास करंडे,ला.ऍड.भारत वाघुले ,ला.ज्योती कटेकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. सलग दोन्ही दिवशी सूत्र संचालन ला.स्वाती जोशी यांनी केले.