मंगळवेढा प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग विकासाला नवीन दिशा देणाऱ्या महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण कमिटीमध्ये आपले दमदार आमदार समाधान आवताडे यांची तज्ञ सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
सहकारी सूतगिरण्या सुरळीत चालाव्यात तसेच आर्थिक अडचणीतुन बाहेर याव्यात यासाठी राज्यसरकार आणि वस्त्रोद्योग विभाग यांच्यातर्फे धोरण ठरविले जाते.
वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगांपैकी असून हजारो कुटुंबांचा चरितार्थ चालवण्याची क्षमता या उद्योगात आहे.वस्त्रोद्योगाची क्षमता लक्षात घेऊन क्षेत्राचे प्रश्न सकारात्मक पद्धतीनं आमदार आवताडे कडून सोडवण्यात येतील तसेच कापूस तेथे गिरणी हे धोरण केंद्रस्थानी ठेऊन कापूस उत्पादक क्षेत्रात मेगा टेक्सटाइल पार्कची उभारणी याकरिता ही आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग होईल हा विश्वास व्यक्त केला जात आहे.

