खर्डी प्रतिनिधी अमोल कुलकर्णी
ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री सिताराम महाराज यांची पुण्यतिथी 22 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. दुपारी ठीक बारा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत समाधीवरती पुष्प वर्षाव करण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता सिताराम महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा करण्यात आली. पालखी गाणगापूर येथे प्रस्थान ठेवणार आहे. मंगळवेढा,सोलापूर, अक्कलकोट मार्गे गाणगापूर येथे दत्तभेटीला जाणार असल्याची माहिती पालखी ट्रस्ट सोहळा प्रमुख विकास कुलकर्णी यांनी दिली.सदर भंडारा पुण्यतिथी सोहळा निमित्त विविध राजकीय नेते, शासकीय पदाधिकारी तसेच ग्रामस्थ भाविक उपस्थित होते.
आलेल्या भाविकांना समाधी मंदिर ट्रस्ट खर्डी यांचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य विश्वस्त हरिभाऊ कुलकर्णी, ट्रस्ट अध्यक्ष दीपक रोंगे सचिव गंगाधर केसकर ,हणमंत केसकर,बापू केसकर उमेश परिचारक, किरण मोकाशी, आदी उपस्थित होते.