सोलापुर प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुपर मार्केट जूनी मिल कंपाउंड समोर त्यांच्या पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती दिली की, महात्मा ज्योतीबा फुले हे सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, जातीव्यवस्था आणि महिलांसाठी शिक्षण अशी अनेक सामाजिक कार्य केले. दलितांना समान हक्क मिळावा म्हणून त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. त्यामध्ये सर्व धर्म आणि जातीतील लोक या संघटनेत सामावून घेतले. मुलींसाठी पहिली शाळा फुले दापंत्यांनीच पुणे येथे काढले.
आज भारतामध्ये ज्या मुली शिक्षण घेत आहेत, त्याचे सर्व श्रेय फुले यांना जाते. कामगार स्त्रियांचा आणि अस्पृश्य समाजाच्या अनेक शतकांपासुन होत असलेल्या शोषणाचा, अत्याचाराचा व सामाजिक गुलामगिरीचा त्यांनी कडाडुन विरोध केला. सावकारांविरोधात आणि नौकरशाही विरूध्द त्यांनी युध्द पुकारले. वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था या शोषण व्यवस्था असुन जोपर्यंत या पुर्णपणे नष्ट होत नाहीत तो पर्यंत एका समाजाची निर्मीती असंभव आहे अशी त्यांची रोखठोक भुमिका होती त्यांचे कार्य समाजाला अतिशय उपयोगी आहे. अश्या थोर महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली.
यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, मा. नगरसेवक विनोद भोसले, देवीदास गायकवाड, अंबादास गुत्तिकोंडा, सुनील रसाळे, NK क्षीरसागर, राजन कामत, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, मधुकर आठवले, नूर अहमद नालवार, चक्रपाणी गज्जम, सुमन जाधव, डॉ अप्पासाहेब बगले, लखन गायकवाड, VD गायकवाड, प्रमिला तुपलवंडे, सायमन गट्टू, राजेश झंपले, वसिष्ठ सोनकांबले, पंडित बुवा गणेशकर, शोभा बोबे, सोमनाथ व्हटकर, हाजी महमूद शेख, श्रीकांत दासरी, शुभांगी लिंगराज, बसंती सालुंखे, मुमताज शेख, चंदा काळे, नुसरत शेख, निर्मला निजमल्लू, दीपक आठवले, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते