पंढरपूर प्रतिनिधी
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने तालककोटरा स्टेडियम, नवी दिल्ली मध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2022 पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते पंढरपूर नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण चा पुरस्काराने गौरवण्यात आले. पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अरविंद माळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.