भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील पळशी गावचे सुपुत्र धनंजय अशोक बागल यांची युवा सेना तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाळवणीचे युवा नेतृत्व सुनील सराटे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पळशी गावचे सुपुत्र योगेश गोरख जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंढरपूरचे युवा उद्योजक बालाजी उद्धव बागल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मित्रपरिवार पटवर्धन कुरवलीचे युवा नेते नागेश उपासे,भाळवणीचे माजी सरपंच विठ्ठल चौगुले, पांडुरंग चौगुले, निहाल राज शेख, एच.जी.मुजावर सप्लायर्सचे मालक श्रीअनवर मुजावर कोर्टी इत्यादी उपस्थित होते.