शिवतीर्थ श्रीपूर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाले
श्रीपूर प्रतिनिधी
छ्त्रपती शिवाजी महाराज चौक श्रीपूर येथे 'एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी' हा उपक्रम दि.२४ ऑक्टोबर २०२२ रोजी दीपावली शुभमुहूर्तावर लखलखत्या ११११ आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्याचे आयोजन राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस तालुका व राजे ग्रुप श्रीपूर-महाळूंग यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते तो उपक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला
यंदाही दिवाळीनिमित्त श्रीपूर येथे आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्यावतीने फराळ मोहीम राबवून गोरगरीब,पीडित,अपंग,वयोवृध्द,कामगार,शेतकरी,शेतमजुर,एडसग्रस्त विद्यार्थी,अनाथग्रस्त कुटुंबे यांच्यासोबत आनंदाची दिवाळी साजरी करण्याचे अभिनव उपक्रम गेली ०५ वर्ष झाले चालू आहे,गडकिल्ले संवर्धन मोहीम व गडकोटांवर्ती दीपोत्सवाचे आयोजन केले जाते.
यंदाही लखलखत्या ११११ दिव्यांची रोषणाई पाहण्यासाठी छ्त्रपती शिवाजी महाराज चौक श्रीपूर या ठिकाणी गर्दी झाली होती लक्ष दिव्यांनी उजळून निघालेल्या छ्त्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी राजे ग्रुपचे अध्यक्ष बबन कदम,राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस तालुकाध्यक्ष हिम्मत नागणे, युवक ता.अध्यक्ष बिभीषण पाटील, डॉ.नागनाथ दगडे सुमित नागणे,शिवराम गायकवाड,अजित नागणे, विकास नागणे,बजरंग भोसले, सौरभ धुमाळ, नंदू इंगळे, भैय्या मोरे,अथर्व तोडकर, राजू पवार, जीवन मोहिते, राजे भोसले, विकास जाधव,भैय्या साळुंखे, उमेश यादव, सागर पवार, किरण गुडे, सिकंदर पठाण, जावेद डांगे आदी