दि.१७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणार ही प्रक्रिया!
पंढरपूर प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता प्रथम वर्ष बी.फार्मसीच्या (पदवी) प्रवेशासाठी येथील स्वेरीच्या बी. फार्मसी महाविद्यालयात फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्र.-६३९७) या केंद्राला मान्यता दिली असून बुधवार, दि.२८ सप्टेंबर २०२२ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व छाननी आदी बाबी सुरू झाल्या असून रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया दि.०३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होती परंतु दिलेल्या अवधीत अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला डीटीई कडून मुदतवाढ देण्यात आली असून आता सोमवार, दि.१७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर बी.फार्मसी कॉलेज निवडण्याची प्रक्रिया सुरु होईल.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित बी.फार्मसी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया बुधवार, दि. २८ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली होती. या प्रक्रियेला आता मुदतवाढ मिळाली असून आता ही प्रक्रिया सोमवार, दि.१७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणार आहे.
या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी व छाननी आदी प्रक्रिया चालणार आहेत. रजिस्ट्रेशनची तात्पुरती यादी दि. १८ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द होणार आहे. तात्पुरत्या यादीनंतर विद्यार्थ्यांचे चुकलेले अर्ज दुरुस्त करून घेण्यासाठी दि.१९/१०/२०२२ ते दि.२१/१०/२०२२ हा कालावधी असणार आहे. ‘अंतिम यादी’ दि.२२ ऑक्टोबर २०२२ रोजी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर होईल.
स्वेरीमध्ये बी. फार्मसीची स्थापना २००६ साली झाली असून बी.फार्मसी प्रथम वर्षाचे प्रवेश फॉर्म भरण्याकरीता पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सोलापूर, सांगली,पुणे अशा ठिकाणी जात होते. स्वेरीमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केंद्र झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता इतरत्र जावे लागत नाही.
स्वेरी फार्मसी महाविद्यालयाचा शैक्षणिक क्षेत्रातील चौफेर विकास पाहून तंत्रशिक्षण संचालकांनी स्वेरी बी. फार्मसीला प्रवेश प्रक्रिया केंद्र (एफ.सी. क्र.-६३९७) केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे या अभावी प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे. बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेचा लाभ बारावी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येईल.
यासंबंधी अधिक माहितीसाठी बी.फार्मसी प्रवेश प्रक्रिया केंद्राचे प्रभारी प्रा.रामदास नाईकनवरे (मोबा.क्र ८३९०९०६१४६) व डॉ. वृणाल मोरे (मोबा.क्र-९६६५१९६६६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी http://www.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन देखील केले आहे.