सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व लायन्स क्लब सोलापूर रॉयल, पंचमुखी गणेशोत्सव मंडळ, नगरसेविका मेनका ताई शिवराज राठोड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोंबर सेवा सत्ता अंतर्गत आजची आठवी ॲक्टिविटी म्हणून नूतन प्रशाला जयकुमार नगर विजापूर रोड येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याचे उद्घाटन नगरसेविका मेनकाताई राठोड व उपविभागीय सभापती शैलेश कोरवार यांच्या हस्ते व ज्येष्ठ लायन नागेश बुगडे, ममता बुगडे लायन्स क्लब अध्यक्ष लायन अभियंता सागर पुकाळे मंडल आधिकारी शिवराज राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
त्यानंतर रक्तदानाची सुरुवात लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी चे अध्यक्ष लायन अभियंता सागर पुकाळे मंडलाधिकारी शिवराज राठोड यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली नंतर खजिनदार राजेश परसगोंड व झोन सेक्रेटरी नितीन साळुंखे यांच्यासह चाळीस जणांनी रक्तदान केले यावेळी बोलताना अध्यक्ष सागर पुकाळे म्हणाले की वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही रक्ताचा प्रश्न सतत भेडसावत असतो.
रुग्णांना रक्ताची गरज असली की कुटुंबीय सैरभैर होतात. थॅलेसेमिया असलेली मुले रक्ताचा तुटवडा पडला की जीवन-मरणाच्या रेषेवर झुंजत राहतात व म्हणून आम्ही समाजाची गरज ओळखून लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी च्या माध्यमातून हा रक्तदानाचे उपक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले.