सोलापूर प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्टेट लेव्हल टेक्निकल प्रोजेक्ट कॉम्पीटेशन 'नवधारा २के२२' सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या कॉम्पीटेशनमध्ये पहिल्या फेरीतून १७० टीम आणि ७०० विद्यार्थी अंतिम फेरीमध्ये निवड झाली होती. यामध्ये व्हीआयटी , सीओइपी, एमआयटी,अथर्व कॉलेज, कोल्हापूर कॉलेज अशा अनेक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सिंहगड सोलापूर या कॉलेज मधील ९ टीम्स आणि ३० विद्यार्थी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स या शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यामध्ये प्रथम क्रमांक संकेत गुरव, दुंडाप्पा व्हणारे, सुजाता दुधभाते, कोमल मोरे यांनी पटकावला. सुप्रिया विभुते, कोमल अवताडे, साक्षी घाडगे, गणेश देशपांडे, शुभम बरबडे, रोहिणी काकडे, ओंकार तानवडे , नरेश मेंडगुडले, आकाश कामरेड्डी, मृगंक मोरे, श्रद्धा कविटकर, आश्लेषा शिंदे सोनल केवले, मुस्कान मकानदार, प्रेरणा देशमाने, आदिबा काझी, साक्षी भोसले, मेरज जांभई, मुकुंद बोगा, साना बागवान यांना कन्सोलेशन प्रायझ विनर्स मिळाले व या सर्व विद्यार्थ्यांना सिंहगड अभियांत्रिकी महावि्यालयातील मेकॅनिकल विभागातील प्राध्यापक अविनाश लावणीस यांचे मार्गदर्शन लाभले आणि कॅपजेमिनीचे डायरेक्टर यांनी या सर्व प्रोजेक्ट व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले,प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व शेखर जगदे आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.