भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात नवरात्र महोत्सव निमित्त व आरोग्य सेवा प्रगत व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा युवा सेना संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजी बाबर सांगोला तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे पांडुरंग चे संचालक भगवान चौगुले, विठ्ठल चे संचालक धनंजय काळे,सरपंच राजकुमार पाटील, उपसरपंच सविता लोखंडे,हभप तात्या महाराज चौगुले,उद्योजक विजय शिंदे,सुनील पाटील,रणजीत जाधव,नितीन शिंदे,जिगर गायकवाड,सचिन कुचेकर, लुकमन इनामदार,सचिन भोसले,भोजलिंग बाबर, निहाल शेख,अमोल लिंगे,नामदेव माने देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत रेपाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवाजी बाबर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत आ.शहाजी बापू पाटील, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत व उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमान माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत महिलांच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली जात आहे.तसेच विविध प्रकारच्या तपासण्या सुध्दा केल्या जात आहेत.तरी सर्व महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी बाबर यांनी केले आहे.
यावेळी महिला,आरोग्य केंद्र कर्मचारी ,आशा, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.