भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे ऊसतोड करीत असलेल्या कामगारांना पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून दिवाळी सणानिम्मित गोड फराळा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी पांडुरंग कारखान्याचे संचालक भगवानराव चौगुले म्हणाले,की इतर जिल्ह्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या नातेवाईकांना सोडून ऊसतोडीसाठी ऊस मजूर येत असतात. त्यामुळे येथे रस्त्याच्या कडेला घर करून राहणाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण साजरा झाला पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या उद्देशाने स्व. सुधाकरपंत परीचारक यांनी सर्वच ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम सुरू केला होता. तोच सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवीत पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी ही पंढरपूर तालुक्यात वेगवेगळया ठिकाणी ऊसतोडणी साठी कार्यरत असलेल्या ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळ किट वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे गरीब ऊसतोड कुटुंबातील अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे. तसेच सभासद व कार्यकर्त्यांमधूनही या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
यावेळी पांडुरंग कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे, ज्ञानेश्वर गवळी, ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे, ऊसतोड पुरवठा अधिकारी दादासाहेब देशमुख, भैरी गवळी, संजय गवळी,विलास देशमुख,मारुती गवळी, अग्री वर्शर झांबरे, सेंट्रल इन्चार्ज लोखंडे आदी मान्यवर व ऊसतोड कामगार उपस्थित होते.