मुंबई प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
साहित्यिका कस्तुरी देवरुखकर यांचा पहिला ललित लेखसंग्रह 'ती घरात बसली म्हणून..' ५आक्टोबर या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित झाला.मराठी अभिनेत्री अश्विनी कासार(कमला फेम)आणि रंगभुषाकार(मेकप आर्टीस्ट मराठी,हिंदी चित्रपटसृष्टी)रिया पांचाळ यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
आतापर्यंत रसिकवाचकांनी मला भरभरुन साथ दिली आहे.त्यामुळेच गद्य असो वा पद्य मी ताकदीने लेखनप्रपंचन करू शकतेय.असे मत कवियत्री/लेखिका कस्तुरी देवरुखकर यांनी व्यक्त केले.या लेखसंग्रहात वेगवेगळ्या विषयांवरचे वृत्तपत्रातील'शब्दकस्तुरी'या सदरात गाजलेले एकूण ३३लेख आहेत.बालरंगभूमी,अश्रू,गाव माझं न्यारं,हरवले रे बालपण,'अ'आईचा,निसर्गराजा,पितृपक्ष,रिमझीम पाऊस,शब्द सामर्थ्य,भावविश्व समाजमाध्यम,जागर स्त्री शक्तीचा,दिवाळीतले किस्से,वृक्षारोपण,ती घरात बसली म्हणून अशा एकाहून एक सरस अन् निरनिराळ्या विषयांवरील लेखांचा या संग्रहात समावेश आहे.
नशाॅपिजन प्रकाशन संस्था,गुजरात येथुन हे पुस्तक प्रकाशित झाले असून या संग्रहाचे आकर्षक मुखपृष्ठ साकरले आहे सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी. तसेच पूणे येथील जेष्ठ साहित्यिक मुद्रित शोधनातील तज्ञ अरुण कमळापूरकर यांनी लेखसंग्रहाला सुरेख पाठराखण दिली आहे
त्याच प्रमाणे ठाणे येथील कोकण उद्योजक सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा व माझी इरकली ब्रॅण्डच्या सर्वेसर्वा सौ.तेजल नाईक सोपारकर यांनी आशिर्वादपर शब्दसुमन अर्पण करून कस्तुरी यांना शुभेच्छा दिल्यात.वाचकांना हे पुस्तक शाॅपिजन प्रकाशन संस्थेच्या वेबसाईटवरून तसेच अमेझाॅन आणि फ्लिपकार्ट मागविता येईल.
साहित्यिका व लेखिका कस्तुरी देवरुखकर यांना"ती घरात बसली म्हणून"या प्रकाशित झालेल्या लेखसंग्रहाला साहित्य क्षेत्रातील व लेखन क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.