सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या ९ विद्यार्थ्यांची 'कॉग्निझंट' या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये दिया कुडची, नागदत्त गज्जम, अथर्व शिर्के, ऋतूजा गाडी, स्नेहल कोर्टेकर, श्रीनिवास वाघमारे, रौनक नवगिरे, संमित पाटील, प्रभाकर ईप्पाकायल या विद्यार्थ्यांची निवड झाली व त्यांना वार्षिक '४.५ लाख' पॅकेज मिळाले असून यामध्ये मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल या विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.
सिंहगड संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीमध्ये सहजरीत्या प्लेसमेंटची संधी प्राप्त होते. सिंहगड ची खास वैशिष्ट्य म्हणजे हि संस्था राजकारण विरहित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत असलेले कौशल्य बाहेर येण्यासाठी महाविद्यालय प्रोजेक्ट बेस लर्निग ही काळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रकल्प आधारित शिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व प्रगती कशी होईल यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग परिश्रम घेत असतात.
दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निसर्ग रम्य वातावरण व अभ्यासासाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध आहेत. याचबरोबर सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम महाविद्यालयात प्रत्येक वर्षी राबविले जात असल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या कला व कौशल्य सादर करण्यासाठी वाव मिळतो. टीचर गार्डियन पद्धतीमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते व त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते.आयटी कंपनीत विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या कौशल्यामुळे त्यांना अनेक संधी मिळत आहेत.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे व तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.