मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
नामदेव हितवर्धक मासिकाचा हीरकमहोत्सव स्वामी कृपा हाॅल, पुणे येथे मोठ्या दिमाखात नुकताच संपन्न झाला. यावेळी मी आता ही पालखी आपल्या खांद्यावर देत आहे असे भावनिक उद् गार ९३ वर्षीय मासिकाचे मुख्य मार्गदर्शक ऋषीतुल्य तु. पां. मिरजकर यांनी व्यक्त केले.
नामदेव समाजोन्नती परिषद पुरस्कृत नामदेव हितवर्धक मासिकाने या वर्षी हीरकमहोत्सव वर्षात पदार्पण केले आहे. यांचे औचित्य साधून नामदेव समाजोन्नती परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजीव तुपसाखरे यांचे अध्यक्षतेखाली प्रा. नि. ना. रेळेकर याचे हस्ते स्वामी कृपा हाॅल, पुणे येथे प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात नुकताच संपन्न झाला. तर मासिकाचे बोधचिन्हाचे प्रकाशन वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मासिकाचे मुख्य मार्गदर्शक तु. पां. मिरजकर, संपादक चंद्रकांत सारंगधर, डाॅ. अजय फुटाणे, संजय नेवासकर, संदिप लचके, संजय बोंगाळे, सुनिल पोरे, निलेश बोंगाळे यांचेसह महाराष्ट्रातील अनेक प्रतिनिधी व प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना
माजी आमदार रामदास फुटाणे म्हणाले की, तरूणाईने आता सामाजिक कार्याची धुरा सांभाळली पाहिजे. तर मला समाजाने दिलेल्या शिक्षवृत्तीमुळे माझे शिक्षण पूर्ण करू शकलो. मी आता कामाने नाहीतर वयाने थकलो असून मासिकाची ही पालखी आपल्या खांद्यावर देत आहे असे भावनिक उद् गार ९३ वर्षीय ऋषीतुल्य तु. पां. मिरजकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. नि. ना. रेळेकर म्हणाले की एखाद्या ज्ञातीचे मासिक सलग ६० वर्षात पदार्पण करीत आहे हे विरळच. अशा या मासिकाचा शताब्दी महोत्सव साजरा व्हावा अशा शुभेच्छा दिल्या. ६०दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशात मासिकाच्या दसरा-दिवाळी विशेषांकास औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. १ मे १९६३ पासून आजतागायत सलग ६० वर्षांमध्ये मासिकाच्या जडणघडणीमध्ये हातभार लावणाऱ्या मासिकाचे सर्व व्यवस्थापक मंडळ सभासद, लेखक, जाहिरातदार, हितचिंतक आणि मार्गदर्शक यांचेसह पुरस्कृत नामदेव समाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी व सर्व ज्ञाती संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा याप्रसंगी शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन नासप पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे, मासिकाचे उपसंपादक राजकीशोर सुपेकर, सुरेश वनारसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश हिरवे, विजय कालेकर, प्रशांत भोंडवे यांनी बहुमोल सहकार्य केले.सूत्रसंचालन मोहन खटावकर, तआभार सुरेश वनारसे यांनी मानले.