भाळवणी प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी तालुका पंढरपूर येथे विविध उपक्रम राबविले जातात.
त्याचाच एक भाग म्हणूणआकाश कंदील तयार करणे कार्यशाळा उत्साहात संपन्न दीपावली निमित्त विद्यार्थ्यांना घरच्या घरी आकाश कंदील बनवता यावा याकरिता न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी येथे कलाशिक्षक श्रीगोंजारी देवानंद लक्ष्मण . व खरात तुकाराम शिवाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश कंदील कार्यशाळा प्रशालेत उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी शिक्षक गोंजारी यांनी विद्यार्थ्यांना आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले जवळपास 207 विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात सहभाग नोंदवला सदर उपक्रमाचे कौतुक विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड साहेब उप प्राचार्य पिसे यांनी केले तसेच विद्यालयातील सर्व सहकारी बंधुभगीनी उपस्थित होते .