सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहरातील पूर्व भागातील तेलंगाणा संस्कृती ब्रतकम्मा उत्सवाच्या माध्यमातून दिसून येते. अष्टमीच्या दिवशी घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, रोगराई कमी होण्यासाठी, सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी पदमशाली समाजातील महिला भगिनी पारंपारिक वेशभूषेत ब्रतकम्मा समोर फेर धरून आकर्षक फुलांनी सजविलेल्या ब्रतकम्मा समोर देवी ची आराधना करतात या ब्रतकम्मा उत्सवात शास्त्री नगर राम मंदिर, वॉलचंद कॉलेज जवळील पंचमुखी हनुमान मंदिर, पद्मा नगर येथे पदमशाली समाजातील महिला भगिनीसोबत ब्रतकम्मा उत्सवात सहभागी होऊन *आमदार प्रणिती शिंदे सहित सर्व महिला भगिनींनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या ब्रतकम्मा भोवती फेर धरून "ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो" या सारखे लोकगीते म्हणत आमदार प्रणिती शिंदें सह सहभागी महिला भगिनी घरात सुख समृद्धी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, सर्व इच्छा प्राप्तीसाठी, देवीची आराधना केली.*
यावेळी महिला भगिनी नागरिक मोठ्ठया संख्येने उपस्थित होते.