शेळवे प्रतिनिधी संभाजी वाघुले
धनत्रयोदशी च्या शुभ मुहूर्तावर रोडे पाटील कुटुंबाने किसनाबाई व बापुराव मारुती रोडे पाटील यांच्या १०५ वर्षीय शताब्दी महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी ह.भ.प. संतोष महाराज बढेकर यांची किर्तन सेवा झाली तसेच श्रीराम महाराज वाळुंज आणि संपूर्ण वारकरी टिमने उत्कृष्ठ किर्तन साथ दिली.
या प्रसंगी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे मा.अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्तजी निकम,सतिश रोडे पाटील,प्रभाकर दाभाडे, गोविंद नाना खांडगे,बाबाजीशेठ गावडे, सोमनाथ शेठ पोंदे,आदि मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच परीसरातील पै पाहुणे सर्व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुत्रसंचलन सुप्रसिद्ध निवेदक निलेशजी पडवळ यांनी केले तर आभार गोपिनाथ वाळुंज यांनी व्यक्त केले.