सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने आज दिवाळी पाडवा व भाऊबीज या शुभ मुहूर्ताचे आवचित्त साधून लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या माध्यमातून पुकाळे बिल्डर्स व त्यांच्या परिवाराच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या बेघर केंद्र जुन्या स्टेडियम मागे कुमठा नाका सोलापूर येथे गरीब, गरजू ,अनाथ, वंचित महिला व वृद्धांना मा. उमेश कदम (उपसंपादक दै. दिव्य मराठी) व अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांच्या शुभ हस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष इंजि. सागर पुकाळे म्हणाले की दिवाळी ही आपल्या सर्वांसाठी आनंदाचा सण आपण सर्व जण मोठ्या उत्साहाने गोड धोड करुन फटाके उडवून पाहुण्या रावळ्यानां भेटून साजरे करतो पण समाजात आज ही कित्तेक लोक आहेत त्यांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही. कित्तेक जण दुसऱ्यांना दिवाळी साजरी करताना पाहून त्यातच आनंद मानतात ह्या बऱ्याच दिवाळी म्हणजे इतरांच्या बंगल्यावर झगमगणारी रोषणाई व आकाशीदिवे बघून आपल्या झोपडीत जळणाऱ्या दिव्या कडे पाहून उज्वल भविष्याच स्वप्न पाहन हीच त्यांची दिवाळी असते पण ह्या सगळ्या
आत्महत्याग्रस्त कुटुंबातील अनाथ निराधार वंचित भिक्षा मागणारे रस्त्यावरील बेघर व बेवारस लोकांची दिवाळी गोड व्हावी त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत आम्ही लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व पुकाळे बिल्डरच्या माध्यमातून आज हा छोटासा प्रयत्न केला असल्याचे म्हाणाले यावेळी सचिव ला. रविकिरण वायचळ खजिनदार ला. राजेश परसगोंड जेष्ठ लायन नागेश बुगडे ला. ममता बुगडे पुकाळे परिवाराचे राजेंद्र पुकाळे मिनाक्षी पुकाळे व सोनालिका पुकाळे बेघर केंद्राचे व्यवस्थापक अशोक वाघमारे महापालिकेचे समुह संघटक वसीम शेख, प्रा. विक्रमसिंग बायस इत्यादी जण उपस्थित होते.