अकलूज प्रतिनिधी
राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे १०० रुपयात शिधा वाटपाचा वितरणाला अकलूज येथे सुरुवात झाली आहे.
आनंदाचा शिधा या किट मध्ये एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चणाडाळ एक लिटर पामतेल या चार वस्तूचा शिधा संचाचे अंत्योदय व प्रधान्य कुटुंब योजनातील पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रतिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले तीन रेशन दुकान मध्ये ९४० कीट वाटप करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित सोलापूर भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी इतर नागरीक उपस्थित होते.
त्यावेळी धन्यवाद मोदीजी यांच्या योजनेची पूर्ण माहिती जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू यांनी यावेळी सांगितले, राज्यातील ७ कोटी शिधापत्रिकाधारकांना सदर निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या दिवाळीचा आनंद वृद्धिंगत झाला आहे दिवाळीच्या या विशेष भेटी साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचा मनःपूर्वक धन्यवाद मानले.