भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील माळावरील श्री भवानी देवीची यात्रा रविवार दि.०९/१०/२०२२ ते सोमवार दि.१०/१०/२०२२ रोजी या दोन दिवशी भरवली जाणार आहे तरी सर्व यात्रेकरूना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन सरपंच राजीव पाटील यांनी केले आहे.
यात्रेतील कार्यक्रम पुढील प्रमाणे रविवारी. ९/१०/२०२२ रोजी पहाटे पाच वाजता श्री ची महापूजा व अभिषेक संध्याकाळी साडेपाच वाजता श्री ची महापूजा करण्यात येणार आहे. तसेच रात्री आठ वाजता छबिना मिरवणूक करण्यात येणार आहे.गावाचा रविवारचा आठवडी बाजार पण यात्रेत भरवला जाणार आहे
सोमवारी १०/१०/२०२२ रोजी पहाटे पाच वाजता महापूजा व अभिषेक करण्यात येणार आहे तसेच नऊ वाजल्यापासून लेझीम ,गजीढोल ,धनगरी ओव्या व भेदी गाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण त्या दिवशी संध्याकाळी करण्यात येणार आहे.
तरी भाविकांनी स्पर्धेत सहभागी होऊन यात्रेस शोभा आणावी,अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.