भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे राज्याचे उत्पादन शुल्क खात्याचे कॅबिनेटमंत्री शंभूराजे देसाई यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लुकमान इनामदार व शिवसेना शिंदे गटाचे पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजी बाबर यांच्या हस्ते विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी देसाई म्हणाले की ,मी या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना याविषयी सूचना देऊन योग्य ती कारवाई करण्यास सांगतो.
यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.