सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील वंचित मुलीसाठी सायकल बँकेची योजना सुरू केली नुकताच सोलापूर येथील मानाचा आजोबा येथे भारतीय स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सवानिमित्त कैलासवासी वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान सोलापूर, भुसार अडत व्यापारी संघ श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड व सिद्धसंग प्रतिष्ठानच्या वतीने ७५ सायकल काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सोपविण्यात आल्या. आज रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथे प्रत्यक्ष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकल प्रदान कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला यानुसार जिल्हा परिषद येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या हस्ते वंचित विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी किरण लोहार, सिद्ध संघ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वाले, माजी नगरसेवक एन के क्षीरसागर, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे माजी उपाध्यक्ष सहदेव इप्पलपल्ली, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, विस्तार अधिकारी जयश्री सुतार, मुख्याध्यापक लिंबराज जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार गट शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला शिका मोठे व्हा आई-वडिलांचे व आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक करा असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हणाले.
यावेळी सिद्ध संघ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वाले यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान, भुसार आडत व्यापारी संघ, सिद्धसंग प्रतिष्ठान च्या वतीने ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थिनींना 75 सायकली देण्याचा निर्णय घेऊन काल मा. दिलीप स्वामी यांच्याकडे सायकली सोपविण्यात आल्या. आज रोजी जिल्हापरिषद येथे प्रत्यक्ष ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आले. शाळेला जाण्यासाठी अडचण होत असल्यामुळे त्यांना सायकली देण्यात आल्या. भविष्यात यातील विद्यार्थिनी चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोचावे ही सदिच्छा व्यक्त करतो.
या सायकल प्रदान कार्यक्रमात विद्यार्थिनींनी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.... यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.