पंढरपुर प्रतिनिधी
पंढरपूर येथे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे हे आले असता त्यांना शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजी बाबर व भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे सरचिटणीस लुकमान इनामदार यांनी कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी पत्रकार महेश कदम,गंगाधर माने उपस्थित होते.
या निवेदनात प्रामुख्याने सर्व कामगारांना दुपारचे जेवण मोफत मिळावे त्याचबरोबर विमा संरक्षण मिळावा तसेच मानधनावर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन श्रेणी लागू करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले आम्ही कायमचा अ शब्द काढून संघटित कामगार असे करणार आहे.कामगारांना सर्व सुख सुविधा देण्यात येणार आहेत.नवीन धोरण राबवून कामगारांचे वेतन,घरे,साहित्य असे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.