पंढरपूर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सिनेट निवडणूक 2022 साठी पदवीधर मधून गादेगावचे उपसरपंच गणपत मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल सिनेट निवडणूक 2022 येत्या 29 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे सदर निवडणुकीसाठी गेल्या वेळेस निवडणूक लढवलेले गणपत मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपल्या विजयाची खात्री व्यक्त केली आहे .मागील काही दिवसांमध्ये त्यांच्या माध्यमातून विद्यापीठ पदवीधर मतदार नोंदणी मध्ये आघाडी घेण्यात आली होती .
यावेळी त्यांनी पदवीधरांना नाव नोंदणीचे आवाहन केले होते .सध्या सिनेट पदवीधर मध्ये मोरे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे .आत्तापर्यंत त्यांनी आठ हजार मतदारा पर्यंत पोस्ट कार्ड च्या माध्यमातून पोचल्याचा दावा केला आहे. यामुळे आपला विजय निश्चित आहे अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
उमेदवारी अर्ज भरताना सोलापूर शहर काँग्रेसचे गणेश डोंगरे ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत ,जिल्हा सचिव सुहास टोणपे ,मोहोळचे नितीन कोकाटे ,मनसेचे अनिल आप्पा बागल, सोलापूरचे नगरसेवक तांबोळी ,यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला आहे .त्याचबरोबर महिला मतदारसंघातून वर्षाराणी गोडसे यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .
यावेळी सोलापूर विद्यापीठ सिनेट निवडणूक मोठी रंगतदार होणार हे दिसत आहे गणपत मोरे हे शैला गोडसे यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. विद्यापीठाचे बरेच प्रश्न प्रलंबित असल्यामुळे ते सोडवण्यासाठी चांगले सिनेट सदस्य निवडून देणे गरजेचे आहे.