आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांतुन गुरुनानक चौक, अशोक चौक ते बोरामणी नाका पर्यंत रस्ता दुरुस्ती व अशोक चौक पोलीस स्टेशन मागे पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी पाईपलाईन घालण्याच्या कामाचे ( बजेट 50 लाख ) भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
सोलापूर प्रतिनिधी
आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांतुन मा. आयुक्तांनी सोलापूर महानगरपालिका मुख्य कार्यालय नगर अभियंता रस्ते दुरुस्ती सन 2021-22 अंतर्गत 50 लाख रुपये निधी मंजूर केले त्यातून गुरुनानक चौक, अशोक चौक ते बोरामणी नाका पर्यंत रस्ता दुरुस्ती व अशोक चौक पोलीस स्टेशन मागे पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी पाईपलाईन घालण्याच्या कामाचे भूमिपूजन अशोक चौक पोलीस चौकी समोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
*यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, गुरुनानक चौक ते बोरामणी नाका, अशोक चौक हा रस्ता अतिशय खराब झाला होता, रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते अशोक चौक पोलीस चौकीसमोरील भागात पावसाळी पाण्याचा निचरा होत नव्हता त्यामुळे आजूबाजू परिसरातील वसाहतीत पाणी शिरत होते अनेक नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली होती त्यामुळे मा. आयुक्तांना हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली होती मा. आयुक्तांनी हा विषय मनावर घेऊन मा. नगर अभियंता कारंजे साहेब आणि अधिकारी वर्ग येऊन पाहणी केली आणि 50 लाख रुपये निधी यासाठी मंजूर केला. त्यातून आज रस्ता करण्याचा कामाचा भूमिपूजन संपन्न झाला. महापालिकेचे अधिकाऱ्यांनी चांगले प्रकारे काम करून लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करतील अशी आशा व्यक्त करते. आणि रस्ता होत असल्यामुळे या भागातील नागरिकांचा वाहतुक सुकर होईल.*
*तसेच यावेळी नगर अभियंता संदीप कारंजे म्हणाले की, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीमुळे आयुक्तांनी 50 लाख रुपये निधी मंजूर केला. त्यातून गुरुनानक चौक ते बोरामणी नाका पर्यंतचा जवळपास दोन किलोमीटर चा रस्ता दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतला लवकरात लवकर रस्ता करण्याचा प्रयत्न राहील.*
या कार्यक्रमास नगर अभियंता संदीप कारंजे साहेब, सहा. अभियंता शांताराम अवताडे साहेब, अभियंता मुन्ना तळीखेडे साहेब, अभियंता प्रतीक पुकाळे साहेब, उद्योगपती मल्लीकार्जुन कमटम, मा. परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मा उपसभापती गोवर्धन कमटम, प्रवीण गुर्रंम, प्रभाकर सादुल, रमेश कुंचीकोरवे, NSUI अध्यक्ष सुमीत गडगी बाळूकाका क्षीरसागर, विवेक कन्ना, श्रीकांत वाडेकर, VD गायकवाड, सुनील सारंगी, राजेंद्र शिरकुल, किरण राठोड, विजयकुमार दंडी, सुभाष वाघमारे, सत्यनारायण संगा, संजय गायकवाड, महेंद्र वाकोडे, उमर मुकेरी, श्रीनिवास परकीपंडला, लालू सानी, बाबू जक्कन, लक्ष्मण महिंदरकर, दामोदर आकेन, शिवानंद बलोरगी, दिनेश गोसकी, शिवराज कोरे, राकेश मंथेन, दिनेश रच्चा, रमेश महेश्वरम, प्रभाकर भीमनाथ, अशोक कमटम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.