पंढरपूर प्रतिनिधी
उपसरपंच गणपत मोरे यांनी सिनेट निवडणूक 2022 येत्या 29 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे त्या अनुषंगाने पदवीधर मतदार यांच्याशी प्रत्येक्ष संपर्क साधून आपल्या ला पसंती क्रमांक एक चे मतदान करण्याची विनंती केली.
यावेळी त्यांनी पदवीधरांना आपण सर्वांनी मिळून विद्यापीठाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले. गणपत मोरे यांनी मागील काही दिवसांपासून पदवीधर मतदार नोंदणी व संपर्क यामध्ये आघाडी घेतली आहे. त्यांनी आपण ८००० पदवीधरांनशी पत्र पाठवून संपर्क साधला आहे आसे सांगितले .
सिनेट निवडणूक ही चुरशीची होणार आहे सदर निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी आपल्या विविध प्रकारच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे मागील काही दिवसापासून सिनेट निवडणुकी संदर्भात विविध पक्ष पार्टी यांच्या विविध स्तरावरती बैठका होत असल्याची दिसत आहे सर्वच पॅनल प्रमुख आपल्या पॅनलचा विजय निश्चित असल्याचे सांगत आहेत उद्या 18 सप्टेंबर हा निवडणूक उमेदवारीअर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे यानंतर विद्यापीठ अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करणार आहे.
पदवीधर मधून एकूण 10 सिनेट सदस्य निवडले जाणार आहेत गणपत मोरे यांची उमेदवारी ओपन पदवीधर यामधून आहे त्यांनी आपल्या विजयाचा दावा निश्चित केला आहे.